Sunday, February 21, 2021

आजीची पावभाजी

'आजीची पावभाजी'


एक होती ढोबळी , होती थोडी बोबडी
घालून हिरवा coat, हसायची मात्र लोटपोट. 
एक होता Tomato, friend त्याचा Potato
गुबरे गुबरे गुलाबी गाल , उन्हात गेला की व्हायचे लाल.
एक होता Flower, उडवायचा सारखी Collar,
सगळे म्हणायचे त्याला म्हणूनच,  Cauliflower.
बटाटे दादा आले तिकडून , सुटले होते त्यांचे पोट इकडून तिकडून.
प्यायचे पाणी गटांगटा आणि खायचे मटार मटामटा. 
सगळे मिळून एकत्र, जमवणार  होते फक्कड रात्र. 
तेवढ्यात .... 
तिकडून आला कांदा, म्हणाला झालाय एकच वांदा. 
आत्ताच मी आजीचा ऐकलाय plan, 
पावभाजीसाठी तिनी नविन आणलाय Pan.

आजी सांगत होती रेवाला, बटर लाव जरा पावाला,
हात धुवून ये जेवायला आणि बरोबर घेऊन ये नोवाला. 
सगळे मिळून मारणार आहेत पावभाजीवर ताव,
अजूनही आपल्याला पळून जायला आहे वाव. 
पण कसलं काय?

 आजी didn't listen to their cry.
pan मधे केलं सगळ्यांना केलं मस्त fry, 

अशी माझ्या आजीची पावभाजी, one day you must try.



 






गणपती आणि बॅक्टेरिया

सार्वजनिक गणेशविसर्जन करताना-केल्यावर मूर्तींची होणारी हेळसांड बघून मन विषण्ण झाल्यावर मी डोळे मिटून घेतले होते. अजून काही प्रश्नमाश्या घों...