Monday, September 8, 2025

गणपती आणि बॅक्टेरिया

सार्वजनिक गणेशविसर्जन करताना-केल्यावर मूर्तींची होणारी हेळसांड बघून मन विषण्ण झाल्यावर मी डोळे मिटून घेतले होते. अजून काही प्रश्नमाश्या घोंगावत होत्या, गणेश जन्म माघ चतुर्थीला मग मग गणेशाचा उत्सव भाद्रपद चतुर्थीला? आणि हे दीड-५-७-१० दिवस उत्सवाचं काय प्रयोजन. विचारांच्या तंद्रीत कधी स्वत: विद्यापती अवतरले आणि त्यांच्या मातीपासून जन्म घेण्याची कथा, दीड-५-७-१० दिवस दुध-दही पंचामृतांनी न्हाऊ-माखून मग परत तलावातून(नदीत-विहिरीतून नाही) स्वर्गलोकात त्यांच्या घरी जायचा आणि शेतातल्या पिकाचा काही संबंध आहे का बघ असा विचार वरदान म्हणून दिला. तेवढ्यात ज्यांनी गणेशोत्सवाची कल्पना मांडली ते माझ्या समोर प्रकटले आणि मला त्यांची thought process सांगायला लागले, श्रावण संपता संपता भातलावणी पूर्ण होऊन बळीराजा जरा जरा निवांत आहे, भाद्रपदात हस्त नक्षत्राच्या जोरदार पावसाने भाताची खळी पूर्ण भरली आहेत आणि आता सशक्त पिकासाठी म्हणजेच भाताची “पोटरी” भरण्यासाठी (Tillering stage) उत्तम खताची गरज पडणारे. - ही पोटरी भरायला एकमेव जीवाणू /bacteria मदत करतो तो म्हणजे लॅक्टोबेसिलस (Lactobacillus spp. like Lactobacillus plantarum, Lactobacillus casei, etc.) are plant growth-promoting rhizobacteria (PGPR)) आणि हा bacteria दही दुधात भरपूर प्रमाणात असतो. - मातीतून जन्मलेल्या देवतेचाच आशिर्वाद उत्तम राहिल त्यासाठी! मग शेतातल्या निराकार मातीतून गजानन रूपात गणेशमूर्ती साकारून त्यावर दही-दूधाचाच जर अभिषेक केला आणि जीवामृत बनवता आलं तर? - रोजच्या दही दुधाने ह्या शेतातल्या मातीतून घडलेल्या मूर्तीमधे ओलावा टिकवून ठेवला तर Lactobacillus जिवाणूंच्या भरघोस कॉलनीज बनतील . - ⁠कोकणासारख्या आद्र (humid) प्रदेशामध्ये ही वाढ व्हायला १-२ दिवस तर मराठवाड्यासारख्या कोरड्या प्रदेशात ७-८ दिवस पुरेसे आहेत. (कोकणस्थ-देशस्थ स्वभाव विशेषांचा यात काडीमात्र संबंध नाही) - ⁠आता ही मूर्ती गावाच्या वरच्या अंगाच्या तलावात नेऊन सोडली की तिथून सगळ्यांच्या खळ्यांना हे जिवांमृत मिळेल. - ⁠घराघरातून जर असे गौरी-विनायक जिवामृतांनी (बॅक्टेरिया अमृताने) परिपूर्ण होऊन गावाच्या तलावात आले तर? - जरा निवांतपणा पण आहे तर एकत्र जमून उत्सवाच्या वातावरणात भाताच्या पोटऱ्या भरण्याच्या आनंदात वाजत गाजत, नाचत नाचत या जिवांमृतानी भरलेली विघ्नहर्ताची मूर्ती तलावात विसर्जन करून, सुगीच्या दिवसांचा श्रीगणेशा करूया! गणपती बाप्पा मोरया ऽऽ पण माझ्या खिडकीच्या काचा खडखड का वाजतायेत, भूकंप येतोय की काय, बाहेर बघितलं आणि क्षणार्धात भूतलावर वर्तमानात आलो. विसर्जन रांगेतील शेवटचं मंडळ ११व्या दिवशी दुपारी बारा वाजता लाऊडस्पीकर्सची चीनच्या भिंतीला लाजवेल अशी wall घेऊन, पायात slippers घालून, शर्टची बटणं तोडून, शर्ट फाडून बाहेर डोकावणारी ढेरी सावरत चिकनी चमेलीवर दात ओठ खाऊन, जीभ लवलवत नृत्यसेवा करत, सूर्यकोटी ब्रह्मांडनायकावर lasers टाकून त्याला पुढच्या वर्षी लवकर यायचं आमंत्रण देत होतं. ज्यानी कोणी गणेश विसर्जनाला जाताना गणेशमूर्तीचे डोळे बांधून (कोणीतरी कान पण झाका रे माझ्या बाप्पाचे!) न्यायाची प्रथा चालू केली त्याचे शतशः आभार मानून, परत डोळे मिटून घेतले 🙏 अभिजित जोगदेव (“मेटा आई”ला स्मरून ChatGPT चं chanting करून हे ज्ञान मिळालं त्याबद्दल धन्यवाद 🙏 )

गणपती आणि बॅक्टेरिया

सार्वजनिक गणेशविसर्जन करताना-केल्यावर मूर्तींची होणारी हेळसांड बघून मन विषण्ण झाल्यावर मी डोळे मिटून घेतले होते. अजून काही प्रश्नमाश्या घों...